कविता

ray of hope

आयुष्याचे काय हाल आहे …
मानसा तुझी कमाल आहे..

कसे टालू मी भोग आयुष्याचे ?
एक तोच पुन्हा सवाल आहे…

कुठे गेला तो सारा जिव्हाला ?
साधा कटाक्षही आता जहाल आहे…

क्षण भंगूर सारे तरीहि…
हाव्यासांचा उभा महाल आहे

भोग सरता सरत नाही …
जो तो दुःखाचा च हमाल आहे …

संतोषकुमार
ray of hope

यावर आपले मत नोंदवा